तरुणपणी कशा दिसायच्या सुप्रिया पिळगांवकर; त्यांच्या याच रुपावर भाळले होते सचिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:45 IST2023-08-18T14:45:00+5:302023-08-18T14:45:00+5:30

Supriya Pilgaonkar: सुप्रिया पिळगांवकर यांनी त्यांचा १९९३ सालचा फोटो शेअर केला आहे.

marathi actress supriya pilgaonkar share her portfolio shot photo | तरुणपणी कशा दिसायच्या सुप्रिया पिळगांवकर; त्यांच्या याच रुपावर भाळले होते सचिन

तरुणपणी कशा दिसायच्या सुप्रिया पिळगांवकर; त्यांच्या याच रुपावर भाळले होते सचिन

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिय पिळगांवकर. अशीही बनवाबनवी, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती अशा कितीतरी सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी मराठी कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

सुप्रिया पिळगांवकर कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे त्या कायम त्यांच्या प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात.यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या पोर्टफोलिओचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या कमालीच्या सुंदर दिसत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. इतकंच नाही तर तुमच्या याच रुपावर भाळून सचिन पिळगांवकर तुमच्या प्रेमात पडले, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुप्रिया यांनी १९९३ मध्ये पोर्टफोलिओसाठी फोटोशूट केलं होतं. या पोस्टमध्ये त्यांनी तीन फोटो कोलाज करुन शेअर केले आहेत.
 

Web Title: marathi actress supriya pilgaonkar share her portfolio shot photo