'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं मेंटल हेल्थसाठी थेरपी घेतली, म्हणाली "माझ्या घराण्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:42 IST2025-04-02T14:42:06+5:302025-04-02T14:42:48+5:30
अभिनेत्रीने मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दलही तिने सांगितले.

'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं मेंटल हेल्थसाठी थेरपी घेतली, म्हणाली "माझ्या घराण्यात..."
Sonali Kulkarni on Mental Health:मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni)मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिचा अफाट चाहतावर्ग आहे. 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस' यांसारख्या मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या सोनालीने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. तिनं 'सिंघम', 'दिल चाहता है', 'मिशन काश्मीर', 'प्यार तुने क्या किया', 'दायरा' या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यानं अभिनेत्रीने मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल तिने सांगितले.
सोनाली कुलकर्णीने नुकतीच 'सुमन म्युसिक मराठी' यांच्या 'आम्ही असं ऐकलंय' या सेगमेंटमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सोनालीनं मानसिक आरोग्यावर (Mental Health) भाष्य केलं. अभिनेत्रीनं मेंटल हेल्थसाठी थेरपी घेतल्याचंही सांगितलं. ती म्हणाली, "मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. माझ्या घराण्यातील मी पहिली मुलगी आहे, जिनं मानसिक आरोग्याची काळजी घेतली आणि थेरपी घेतली. मला या गोष्टीचा फारर आभिमान वाटतो. मी अनेकांना सल्ला देते की, तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमैत्रिंणीना, तुमच्या शेजाऱ्यांना तुमचे थेरपिस्ट बनवू नका. त्यांचं स्वत:ताचं आयुष्य आहे. जसं आपल्याला ५०० रुपयांची पण साडी मिळते आणि ५० हजारांची पण साडी मिळते, अगदी तसेच अनेक ठिकाणे आहेत, जिथे स्वस्त समुपदेशनदेखील उपलब्ध आहे. प्रत्येकवेळी जास्त पैसे खर्च करावे लागतात असं नाही".
पुढे ती म्हणाली, "समुपदेशन म्हणजे काय हे शब्द ओळखीचे करुन घ्यायला पाहिजेत. नात्यातील तेढ असते. कामाच्या ठिकाणी आपली होणारी पिळवणूक असते. अशा अनेक गोष्टींमध्ये आपण गप्प राहतो. त्या आपल्याला फक्त वाईट वाटतं राहतं. भावनेचा निचरा होत नाही. मला वाटतं आपण प्रश्नांचा सामना केला पाहिजे, नाही तर ते सुटत नाहीत. मला नेहमी असं वाटतं की घरो वा ऑफिस स्वच्छ संवाद ठेवला पाहिजे. आपल्या काय वाटतंय याबद्दल व्यक्त होणं हे चूक नाही. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा आपण स्वत:वर प्रेम केलं पाहिजे", असं सोनालीनं म्हटलं.
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'सुशीला सुजीत' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुशीला सुजीत' सिनेमा १८ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात सोनालीसोबत स्वप्नील जोशी, सुनील तावडे, नम्रता संभेराव, रीलस्टार अथर्व सुदामे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, राजेंद्र शिसाटकर, अजय कांबळे हे कलाकार झळकणार आहेत. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आगळंवेगळं कथानक असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडे दिवस वाट पाहावी लागेल.