'बलात्कार करणाऱ्या नराधमांना...'; दसऱ्यानिमित्त सोनालीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, थेटच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 16:39 IST2024-10-12T16:38:18+5:302024-10-12T16:39:52+5:30
दसऱ्यानिमित्त सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केलेली जळजळीत पोस्ट चर्चेत आहे (sonalee kulkarni)

'बलात्कार करणाऱ्या नराधमांना...'; दसऱ्यानिमित्त सोनालीची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, थेटच बोलली
आज सगळीकडे दसरा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं देऊन मिठी मारत सर्वजण शुभ दसरा म्हणत शुभेच्छा देत आहेत. अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थांवर ताव मारला जातोय. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी दसऱ्यानिमित्त विविध फोटो पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मात्र दसऱ्यानिमित्त सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट शेअर केलीय.
सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत एक बोर्ड दिसत असून त्यावर जळजळीत वास्तव मांडणारी अक्षरं पाहायला मिळत आहेत. यात लिहिलंय की, "खरा दसरा तेव्हा असेल जेव्हा प्रत्येक बलात्कार करणाऱ्याला नराधमांना भर चौकात जाळले जाईल. त्या रावणाला काय जाळायचे? ज्याने सीतेला स्पर्शसुद्धा केला नाही." अशाप्रकारे सोनालीने पोस्ट शेअर केलीय. या पोस्टचं अनेकांनी समर्थन करुन सोनालीच्या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे.
सोनालीचं वर्कफ्रंट
सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'बकुळा नामदेव घोटाळे' सिनेमातून तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. पुढे अतुल कुलकर्णीसोबत 'नटरंग' सिनेमात काम करुन सोनाली खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आली. पुढे विविध सिनेमांमधून सोनाली झळकली. बॉलिवूडमध्येही तिने काम केलं. लवकरच सोनालीची भूमिका असलेला 'रावसाहेब' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सोनालीसोबत मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.