"मी ओरडल्यानंतर समोरच्या खिडक्यांमधून...", सोनाली कुलकर्णीने सांगितला 'सुशीला-सुजीत'च्या शूटिंगचा किस्सा, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:26 IST2025-04-01T12:22:56+5:302025-04-01T12:26:16+5:30
प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित 'सुशीला-सुजीत' हा सिनेमा १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

"मी ओरडल्यानंतर समोरच्या खिडक्यांमधून...", सोनाली कुलकर्णीने सांगितला 'सुशीला-सुजीत'च्या शूटिंगचा किस्सा, काय घडलं?
Sonali Kulkarni: प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित 'सुशीला-सुजीत' हा सिनेमा १८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली झाली. दरम्यान,या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोनशसाठी चित्रपटाची संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे.
नुकतीच 'सुशीला-सुजीत' च्या संपूर्ण टीमने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चित्रपटातील बाल्कनी सीनच्या शूटिंगचा मजेदार किस्सा शेअर केला. त्यावेळी सोनाली कुलकर्णी म्हणाली, "आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये शूट केलं, त्या बिल्डिंगच्या आजुबाजूलाही इमारती आहेत. पहिल्यांदा मी ओरडल्यानंतर समोरून खिडक्यांमधून जी माणसं आली आहेत, त्या लोकांची काय परिस्थिती झाली असेल."
पुढे सोनालीने सांगितलं, "आम्ही हे शूट पुण्यात केलं आहे. आमची बिल्डिंग जरी नवीन असली तरी बाकीच्या बिल्डिंगमध्ये रहिवासी होते. त्यानंतर ते धडाधड बाहेर आले. म्हणजे बिल्डिंगच्या खाली लोकांनी गाड्या वगैरे थांबवल्या की वरती काय झालंय. पण, हे सगळं करताना खूप मजा आली. म्हणजे आम्हाला मजा येत होती पण त्यांचे बिचाऱ्यांचे हाल झाले. पण, कधी-कधी कळत नाही की रिअल काय आणि रील तसं त्यांचं झालं. आणि सिनेमातही तसंच होणार आहे." असा खुलासा तिने केला.