युद्धामुळे परदेशात अडकलेली मराठी अभिनेत्री, एकनाथ शिंदेंना एक कॉल अन् दुसऱ्याच दिवशी भारतात परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:28 IST2026-03-05T13:25:00+5:302026-03-05T13:28:15+5:30

स्मिता तिच्या कुटुंबियांसोबत परदेशात होती. युद्धामुळे तिला भारतात परत येण्यास अडचणी येत होत्या. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीमुळे ती सुखरुप भारतात परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली आहे. 

Marathi actress smita gondkar stranded abroad due to iran israel war return to india due to eknath shinde | युद्धामुळे परदेशात अडकलेली मराठी अभिनेत्री, एकनाथ शिंदेंना एक कॉल अन् दुसऱ्याच दिवशी भारतात परतली

युद्धामुळे परदेशात अडकलेली मराठी अभिनेत्री, एकनाथ शिंदेंना एक कॉल अन् दुसऱ्याच दिवशी भारतात परतली

अमेरिका-इस्रायल-इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या युद्धामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असून परदेशात अनेक नागरिक अडकून पडले आहेत. मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकरही परदेशात अडकली होती. स्मिता तिच्या कुटुंबियांसोबत परदेशात होती. युद्धामुळे तिला भारतात परत येण्यास अडचणी येत होत्या. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीमुळे ती सुखरुप भारतात परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली आहे. 

स्मिता गोंदकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एकनाथ शिंदेंसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. स्मिताला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आश्वासन देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत स्मिताने पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, "गेल्या काही दिवसांत आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला. मोठ्या स्फोटांचे आवाज, खिडक्या हादरणे, रात्री आकाशात दिसणाऱ्या क्षेपणास्त्रांचे प्रकाश, इंटरसेप्शन आणि पडणारे अवशेष या सगळ्यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होती. दिवसादेखील आकाशात लहान ढगांसारखी रचना दिसत होती. आम्ही सतत आशा करत होतो की परिस्थिती लवकरच शांत होईल आणि आम्हाला लवकरच घरी परतता येईल". 


"परंतु हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे आणि दररोज उड्डाणे रद्द होत असल्यामुळे वारंवार बुकिंग आणि चेक-इन करूनही घरी परतणे जवळजवळ अशक्य वाटत होतं. माझ्यासोबत कुटुंबातील काही ज्येष्ठ नागरिक होते. त्यामुळे ही चिंता आणखी वाढली. या कठीण प्रसंगी मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, श्री. मंगेश देसाई, आणि अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल गेथे यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला.  मी त्यांचे आभार मानते. राहण्याची व्यवस्था करण्यापासून ते वाहतुकीची सोय आणि भारतात सुरक्षित परतण्याचे समन्वय करण्यापर्यंत त्यांनी घेतलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होते", असं तिने म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "आपल्या तत्पर कृती आणि पाठिंब्यामुळे केवळ माझे कुटुंबच नव्हे तर परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना सुरक्षितपणे भारतात परतता आले. अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांप्रती असलेली आपली तत्परता आणि बांधिलकी ही खऱ्या नेतृत्वाचे आणि नागरिकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. एक भारतीय म्हणून मला याचा अत्यंत अभिमान वाटतो की कठीण काळात आपले सरकार आपल्या नागरिकांसोबत ठामपणे उभे आहे". 

Web Title : युद्ध के कारण विदेश में फंसी मराठी अभिनेत्री, शिंदे की मदद से लौटीं।

Web Summary : युद्ध के कारण मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर विदेश में फंसी थीं। एकनाथ शिंदे की मदद से वह सुरक्षित भारत लौट आईं। गोंदकर ने त्वरित सहायता के लिए आभार व्यक्त किया।

Web Title : Marathi actress stranded abroad returns home with Eknath Shinde's help.

Web Summary : War stranded Marathi actress Smita Gondkar abroad. Eknath Shinde's timely help ensured her safe return to India. Gondkar expressed gratitude for the swift assistance.