'एक वेगळी प्रेमकथा'; पावसात भिजणाऱ्या आर्याने सांगितली तिची लव्हेबल लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:23 IST2022-07-18T14:22:18+5:302022-07-18T14:23:02+5:30
Aarya ambekar: आर्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनेक लहान लहान व्हिडीओ एकत्र केल्याचं पाहायला मिळत आहे.

'एक वेगळी प्रेमकथा'; पावसात भिजणाऱ्या आर्याने सांगितली तिची लव्हेबल लव्हस्टोरी
उत्तम गायिका, अभिनेत्री आणि तितकाच लोभसवाणा चेहरा यामुळे आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत झालेली प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणजे आर्या आंबेकर (Aarya Ambekar). कलाविश्वात सक्रीय असलेली आर्या सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यात अलिकडेच तिने भर पावसात कांदा भजी खाण्याचा आनंद घेतला आहे. याचा एक भन्नाट व्हिडीओदेखील तिने पोस्ट केला आहे.
आर्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अनेक लहान लहान व्हिडीओ एकत्र केल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधून तिला पाऊस किती आवडतो हे दिसून येत आहे. पावसावर असलेलं हे प्रेम तिने कॅप्शनमधूनही व्यक्त केलं आहे. "पाऊस आणि कॅलरीज...एक वेगळी प्रेमकथा", असं कॅप्शन देत आर्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतच प्रत्येक व्हिडीओ क्लिपला तिने एक वेगळं कॅप्शनही दिलं आहे.
आर्याने प्रत्येक व्हिडीओमध्ये कॅप्शन दिलं आहे. यात पहिल्या व्हिडीओमध्ये, "मी नेहमीच पावसात बाहेर येत असते कारण छत्रीसोबत क्युट बुमरॅंग काढायचे असतात", असं म्हटलं आहे. त्यानंतर जोडलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिने दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिने भजी आणि चहाचा फोटो शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने "मग मी घरी आले भजी, पकोडा ऑर्डर करायला", असं म्हटलं आहे. तर, तिसऱ्या व्हिडीओमध्ये चहाचा फोटो शेअर म्हटलं की, "त्यानंतर मी आल्याचा चहा बनवला कारण चहा हे सुख आहे". यानंतर आणखी एक व्हिडीओ जोडत ती कॅप्शनमध्ये म्हणते, "भजीसोबत फोटो काढायला विसरु नका.त्यानंतर आर्या म्हणतेय मागे बघून निर्लज्जपणे कॅलरीजवर हसा," असे काही मजेशीर कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दरम्यान, आर्याचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तिच्या आवाजातील लव्हेबल हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळतं. 'सारेगमप लिटिल चॅम्प' या कार्यक्रमातून आर्या प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, गायिका म्हणून ती ओळखली जाते.