'ज्या कलरफूलवर तुम्ही प्रेम केलंत ती...'; पूजा सावंतने शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:20 IST2022-08-10T18:20:00+5:302022-08-10T18:20:00+5:30
Pooja Sawant: अलिकडेच पूजाने इन्स्टाग्रामवर एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने छानशी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा साजशृंगार केला आहे.

'ज्या कलरफूलवर तुम्ही प्रेम केलंत ती...'; पूजा सावंतने शेअर केली खास पोस्ट
मराठी कलाविश्वातील लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत ( Pooja Sawant). वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण करणारी पूजा आज प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2008 साली पूजाने श्रावणक्वीन ही स्पर्धा जिंकली आणि तेव्हापासून ती प्रेक्षकांच्या नजरेत भरली. आजवर पूजाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून लवकरच तिचा 'दगडीचाळ 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी पूजाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजाचा 'दगडीचाळ 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'दगडीचाळ' या चित्रपटात पूजाने सोनल ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे दगडीचाळ 2' मध्येही तिला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यातच नवनवीन पोस्ट शेअर करत पूजा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
अलिकडेच पूजाने इन्स्टाग्रामवर एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने छानशी साडी नेसली असून त्यावर मराठमोळा साजशृंगार केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओतील तिच्या सौंदर्यासोबतच तिने या पोस्टला दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे.
"ज्या कलरफुलवर तुम्ही मनापासून प्रेम केलत, ती पुन्हा येतेय तुम्हां सगळ्यांना भेटायला १८ August दगडी चाळ २," असं कॅप्शन देत पूजाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केलं आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.