Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:20 IST2022-12-04T13:20:12+5:302022-12-04T13:20:41+5:30
Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad : होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता सायलीने पुन्हा एकदा यावर मोठं विधान केलं आहे.

Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!
Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची पोस्ट पडली रे पडली की, तिच्या कमेंट बॉक्समध्ये एकाच नावाची चर्चा होताना दिसते. ते नाव म्हणजे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याचं. होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. मध्यंतरी काय तर त्यांच्या लग्नाची चर्चाही रंगली होती. ऋतुराज व माझं काहीही नाही. या सगळ्या अफवा आहेत, असं सायलीने अनेकदा सांगितलं आहे. पण तरी तिच्या व ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा थांबायचं नाव नाही. आता सायलीने पुन्हा एकदा यावर मोठं विधान केलं आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ हा सायलीचा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये ती मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्तानं ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, ‘आमच्यात खरंच तसंल काहीही नाही. आता तर या अफवांमुळे आमची मैत्रीही संपली आहे. आम्ही आता मित्रांसारखं बोलूही शकत नाही. आमच्यात काहीही नव्हतं. आमचं नावं का जोडलं जातंय, हेही मला ठाऊक नाही. पण ते जोडलं गेलं. अशा अफवांमुळे नाती बिघडतात, पण नाव जोडणाऱ्यांना हे कळतं नाही. ऋतुराज व मी आधी या अफवांबद्दल बोलायचो. जाऊ दे ना अफवा आहेत, या अफवा थांबतील, असं आम्ही म्हणायचो. पण आता दीड वर्षानंतरही या अफवा थांबलेल्या नाहीत. आता मात्र बास्स झालं यार, असं आम्हाला झालंय. मित्र म्हणून त्याच्याबद्दल एखादी पोस्ट टाकायची असल्यास, त्याचं अभिनंदन करायचं असल्याचं मी करू शकत नाही. तो सुद्धा माझ्या कामाबद्दल बोलू शकत नाही...’
दीड वर्षांपूर्वी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटला सायलीने देखील रिप्लाय दिला होता. तिने त्यावर हार्ट इमोजी सेंड केले होते. सायलीचा हा रिप्लाय पाहून दोघांमध्ये मैत्रीपलीकडचं नातं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा अद्यापही सुरू आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील महत्वाचा फलंदाज म्हणून ऋतुराज चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं सहा चेंडुमध्ये सात षटकार ठोकल्याचा पराक्रम करुन दाखवला होता. त्यावरुन नेटकºयांनी सायलीला त्यावर प्रतिक्रियाही विचारली होती. आयपीएलच्या दरम्यान देखील या दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं होतं.