मराठी अभिनेत्रीचा नादखुळा! बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत 'IMDB टॉप १०'मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:15 IST2025-02-12T16:14:55+5:302025-02-12T16:15:56+5:30
सई ताम्हणकरने लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकत IMDB च्या टॉप १० अभिनेत्रींमध्ये मानाचं स्थान मिळवलं आहे (sai tamhankar)

मराठी अभिनेत्रीचा नादखुळा! बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत 'IMDB टॉप १०'मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री
सई ताम्हणकर (sai tamhankar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. सई ताम्हणकरचे अनेक सिनेमे, वेबसीरिज चांगलेच गाजले. तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले. सई सध्या एकामागून एक बॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सईने तिच्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या अभिनेत्रींना नमवत IMDB टॉप १० अभिनेत्रींमध्ये एन्ट्री घेतली आहे.
सईची IMDB टॉप १० अभिनेत्रींमध्ये एन्ट्री
मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडिया वर आली असून IMDb च्या टॉप १० लिस्ट मध्ये सई ताम्हणकर अव्वल ठरली आहे. बॉलिवुडच्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये सई वारंवार दिसत असताना आता IMDb च्या टॉप १० लिस्टमध्ये तिने बॉलिवुड स्टार्स सोबत अव्वल स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवुडमध्ये तिच्या कामाच्या चर्चा तर आहेच पण IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप १० लिस्ट मध्ये सई १० व्या क्रमांकावर आहे.
सईचे आगामी प्रोजेक्ट्स
बॉलिवूड मधल्या अनेक बड्या स्टार्सना मागे टाकत सई IMDb च्या टॉप १० लिस्टमध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. सईच्या कामाचं सातत्य आणि बॉलिवुडमध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामाच्या चर्चा कायम बघायला मिळतात.येणाऱ्या काळात सई बॉलिवुडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स तर करणार असून 'क्राईम बीट', 'डब्बा कार्टेल', 'ग्राउंड झीरो', 'मटका किंग' सारख्या बड्या प्रोजेक्ट्समध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.