रिंकूने शेअर केला चार्लीसोबतचा फोटो; कोण आहे आर्चीच्या आयुष्यातील हा special person
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 14:07 IST2024-04-02T14:06:43+5:302024-04-02T14:07:09+5:30
Rinku rajguru: रिंकूने शेअर केलेल्या फोटोची होतीये सोशल मीडियावर चर्चा

रिंकूने शेअर केला चार्लीसोबतचा फोटो; कोण आहे आर्चीच्या आयुष्यातील हा special person
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (rinku rajguru) आज अनेकांची क्रश म्हणून ओळखली जाते. 'सैराट' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती तुफान लोकप्रिय झाली. आज रिंकूचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच प्रयत्न करत असतात. यात सध्या तिने शेअर केलेला एक फोटो चर्चेत आला आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत तिच्याविषयीचे फोटो शेअर करत असते. यात नुकतेच तिने तिच्या चार्लीसोबत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची गोड मांजर दिसून येत आहे. चार्ली असं तिचं नाव असून रिंकूची ती प्रचंड लाडकी आहे. बऱ्याचदा रिंकू तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी सुद्धा तिने तिच्यासोबतचा सेल्फी शेअर केला आहे.
दरम्यान, रिंकू मराठी कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. नुकताच तिचा झिम्मा २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसंच ती 'सैराट', 'मेकअप', 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा' यांसारख्या सिनेमात झळकली आहे.