प्रभुदेवाच्या गाण्यावर रिंकूने धरला ताल; व्हिडीओमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:29 IST2022-03-11T13:29:01+5:302022-03-11T13:29:26+5:30
Rinku rajguru: अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेसलेली साडी आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

प्रभुदेवाच्या गाण्यावर रिंकूने धरला ताल; व्हिडीओमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना 'सैराट' करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). 'मेकअप', 'कागर' अशा काही चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. अलिकडेच रिंकूचा 'झुंड' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले असून रिंकूही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कलाविश्वाप्रमाणेच रिंकूचा सोशल मीडियावरील वावरही वाढला आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.
अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेसलेली साडी आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती 'हम से हैं मुकाबला' या चित्रपटातील 'सुन रे सखी' या सुंदर गाण्यावर एक्स्प्रेशन्स देत आहे. हे गाणं हरिहरन यांच्या आवाजात स्वरबद्ध झालं आहे.
दरम्यान, 'लहान गोष्टींचा आनंद', असं कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिलं आहे. 'कागर', 'मेकअप' आणि आता झुंड अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली. उत्तम अभिनयशैली आणि पडद्यावर वावरताना तिच्यातील साधेपणा यामुळे रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.