एक्स्प्रेशन्समध्ये रिंकूने दिली मनिषा कोईरालाला टक्कर; पाहा बॉलिवूड गाण्यावर शेअर केलेला आर्चीचा video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:59 IST2022-03-28T10:58:41+5:302022-03-28T10:59:18+5:30

Rinku rajguru: सोशल मीडियावर सक्रीय असलेली रिंकू कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

marathi actress rinku rajguru share her beautiful video on Kehna Hi Kya song | एक्स्प्रेशन्समध्ये रिंकूने दिली मनिषा कोईरालाला टक्कर; पाहा बॉलिवूड गाण्यावर शेअर केलेला आर्चीचा video

एक्स्प्रेशन्समध्ये रिंकूने दिली मनिषा कोईरालाला टक्कर; पाहा बॉलिवूड गाण्यावर शेअर केलेला आर्चीचा video

संपूर्ण महाराष्ट्राला सैराट करुन सोडणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे मेकअप, कागर आणि अलिकडेच आलेला 'झुंड' हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. त्यातच गेल्या काही काळापासून रिंकूचा सोशल मीडियावरील वावरही वाढला आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली रिंकू  कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा सेटवरील किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना, घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करते. यामध्येच तिने एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का?

रिंकूने 'बॉम्बे' चित्रपटातील 'कहे ना हैं क्या' (Kehna Hi Kya) या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये रिंकूने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तसंच ती तिच्याच नादात असून हवेसोबत गप्पा मारतीये की काय? असा भास हा व्हिडीओ पाहून होतो. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेत येत आहे.

Web Title: marathi actress rinku rajguru share her beautiful video on Kehna Hi Kya song