Video: रिंकूचा महाराणी लूक; पहिल्यांदाच दिसली रॉयल अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:03 IST2022-08-03T14:03:18+5:302022-08-03T14:03:55+5:30

Rinku rajguru: रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच भरजरी दागदागिने आणि त्यावर साजेसा मेकअप, हेअर स्टाइल केली आहे.

marathi actress rinku rajguru share her beautiful video maharani look | Video: रिंकूचा महाराणी लूक; पहिल्यांदाच दिसली रॉयल अंदाजात

Video: रिंकूचा महाराणी लूक; पहिल्यांदाच दिसली रॉयल अंदाजात

आर्ची होऊन संपूर्ण महाराष्ट्राला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). नागराज मंजुळे यांचा सैराट गाजल्यानंतर रिंकूने कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. रिंकूदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असून बऱ्याचदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही काळात रिंकूचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महाराणी लूकमध्ये दिसून येत आहे.

रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच भरजरी दागदागिने आणि त्यावर साजेसा मेकअप, हेअर स्टाइल केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ चर्चेत येत आहे. यापूर्वी तिने याच गेटअपमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

दरम्यान, रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला बाजीराव मस्तानी चित्रपटातील अलबेला सजना हे गाणं सुरु असल्याचं पाहायला मिळतं. या व्हिडीओमध्ये रिंकूने दिलेल्या एक्स्प्रेशन्समुळे नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत.
 

Web Title: marathi actress rinku rajguru share her beautiful video maharani look