'साद तुला मन घाली..'; गुलाबी साडीत अन् मराठमोळ्या रुपात रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:22 IST2023-03-22T17:21:47+5:302023-03-22T17:22:36+5:30
Rinku rajguru: गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिंकूने तिचा एक छानसा व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.

'साद तुला मन घाली..'; गुलाबी साडीत अन् मराठमोळ्या रुपात रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा सिनेमा म्हणजे 'सैराट' (sairat). नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'ने मराठी कलाविश्वात तुफान लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरू (rinku rajguru) आणि आकाश ठोसर (aakash thosar) ही जोडी रातोरात सुपरस्टार झाली. रिंकूला तर आजही लोक आर्ची म्हणूनच ओळखतात. रिंकूने अलिकडेच चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ती बरेचदा काही व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिंकूने तिचा एक छानसा व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.
आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा
रिंकूने मराठमोळा साजशृंगार करुन मस्त साडी नेसून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच महाराष्ट्र शाहीर या सिनेमातील बहरला हा मधुमास हे गाणं बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सैराटमुळे कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या रिंकूने कागर, मेकअप अशा काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, ओटीटीवरही तिने पदार्पण केलं असून वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.