प्रिया बापटचा इन्स्टाग्रामला रामराम? 'लास्ट पोस्ट' म्हणत शेअर केला बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:59 IST2023-04-03T17:58:52+5:302023-04-03T17:59:28+5:30

Priya bapat: सध्या प्रियाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

marathi actress priya bapat share her latest photos and says last post | प्रिया बापटचा इन्स्टाग्रामला रामराम? 'लास्ट पोस्ट' म्हणत शेअर केला बोल्ड फोटो

प्रिया बापटचा इन्स्टाग्रामला रामराम? 'लास्ट पोस्ट' म्हणत शेअर केला बोल्ड फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. प्रिया कायम तिच्या चित्रपटांविषयी, नव्या प्रोजेक्टविषयी वा तिच्या वैयक्तिक जीवनाविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. त्यामुळे सोशल मीडियावरही तिचा दांडगा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. मात्र, नुकत्याच तिने केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलं आहे.

प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक बोल्ड ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र, या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन पाहून चाहते चक्रारावले आहेत. प्रियाने लास्ट पोस्ट असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे.
प्रियाने शेअर केलेल्या पोस्टला तिने शप्पथ! 'शेवटी पोस्ट', असं कॅप्शन दिलं आहे. तिचं हे कॅप्शन पाहिल्यानंतर प्रिया सोशल मीडियापासून फारकत घेतीये का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, प्रियाने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून या फोटोशूटपैकी अनेक फोटो तिने यापूर्वी इन्स्टावर शेअर केले आहेत. त्यामुळे त्याच फोटोशूटमधील शेवटचा फोटो आता शेअर केल्यामुळे तिने असं कॅप्शन दिलंय का?  की, खरोखरच प्रियाने सोशल मीडियापासून दूर जायचा निर्णय घेतलाय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
 

Web Title: marathi actress priya bapat share her latest photos and says last post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.