'या' कारणामुळे प्राजक्ताचा ड्रायव्हर करतोय तिला वारंवार इग्नोर; त्याच्यासाठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:38 IST2023-11-23T15:37:44+5:302023-11-23T15:38:11+5:30
Prajakta mali:प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून तिच्या ड्रायव्हरने तिला इग्नोर केल्यापासून काय झालंय हे सांगितलं आहे.

'या' कारणामुळे प्राजक्ताचा ड्रायव्हर करतोय तिला वारंवार इग्नोर; त्याच्यासाठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali)हिने अल्पावधीमध्ये मोठी झेप घेतल्याचं दिसून येत आहे. केवळ अभिनय क्षेत्रच नव्हे तर व्यावसायिकदृष्टीनेही तिने बरीच प्रगती गेली आहे. प्राजक्ताचा स्वत:चा दागिण्यांचा ब्रँड आहे, तिचं फार्महाऊस देखील आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात यश मिळवल्यामुळे आज ती अनेक तरुणांसाठी उत्तम उदाहरण ठरत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. या पोस्टला तिने दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गाडीमध्ये गाणी ऐकायची अनेकांना सवय असते. हीच सवय प्राजक्ताला सुद्धा आहे. मात्र, तिच्या या सवयीमुळे तिचा ड्रायव्हर मात्र चांगलाच कंटाळला आहे.
दिल बहल तो जाएगा इस ख़याल से..। हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से..। रात ये करार की बेक़रार है । तुम्हारा इंतज़ार है..। (गाडीमध्ये हे गाणं ऐकून माझा ड्रायव्हर वैतागलाय.. mobile Bluetooth car ला connect कर रे, म्हंटल्यावर ignore करतो.), असं कॅप्शन देत प्राजक्ताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा लूक प्रेक्षकांना आवडला असून अनेक जण त्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.