Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 02:05 PM2022-10-28T14:05:42+5:302022-10-28T14:08:22+5:30

 Shivani Rangole, Mrinal Kulkarni : आज शिवानी तिचा वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत.

marathi actress Mrinal Kulkarni Special post for daughter-in-law  Shivani Rangole on her birthday | Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

Mrinal Kulkarni : प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय..., मृणाल कुलकर्णींची सूनबाईसाठी खास पोस्ट

googlenewsNext

मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) ही आता कुलकर्ण्यांची सून आहे. होय, मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी यांनी काहीच महिन्यांआधी लग्नगाठ बांधली. आज शिवानी लग्नानंतरचा तिचा पहिला वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत. अगदी सासूबाईंनी सुद्धा आपल्या लाडक्या सूनबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

होय, मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी शिवानीच्या वाढदिवसानिमित्त एक स्पशेल पोस्ट लिहिली आहे. शिवानी सासूबाईंची किती लाडकी आहे, हे या पोस्टवरून तुम्हालाही कळेल.


 
मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट
 प्रिय शिवानी, तू या घरी आल्यापासून जाणवतंय मुलगी असण्याचं सुख ! ‘घरात एक मुलगी असायला हवी’ म्हणजे काय याचा अर्थ आत्ता कळतोय. लगबग , गडबड ,धांदल , हसण्याच्या लकेरी .. विराजसची मैत्रीण ते आमची सून हा प्रवास तू मस्त पार पाडला आहेस. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आम्हाला तुझं कौतुक आहेच, पण नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठी तू नेहेमीच प्रयत्न करतेस हे विशेष महत्त्वाचे.. दोन्ही आज्या तुझ्यावर जाम खूश आहेत ! आपल्या माणसांवर प्रेम करणे आणि ते योग्य पद्धतीने दाखवता येणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते आयुष्यभर करायचे असते हे नेहेमी लक्षात ठेव. 
 आता हळूहळू तुझं काम सुरू झालंय..प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात तब्येत सांभाळणं लक्षात ठेव... डाएटचा अतिरेक नको ! सगळं खायचं आणि व्यायाम चुकवायचा नाही ! हे वर्ष अनेकाथार्नी इव्हेंटफूल गेलंय.. अशीच यापुढली ही सारी वर्ष मनाजोगती जाऊदे ! हॅप्पी बर्थडे..., असं मृणाल कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘शेजारी शेजारी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अ‍ॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. स्टारप्रवाह वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’  या मालिकेत शिवानीने  रमाबाईची भूमिका साकारली होती.शिवानी ही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
 

Web Title: marathi actress Mrinal Kulkarni Special post for daughter-in-law  Shivani Rangole on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.