विदेशात मिताली झाली बोल्ड; हॉट लूकची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:57 IST2023-07-09T15:56:30+5:302023-07-09T15:57:10+5:30
Mitali mayekar: मितालीची विदेशवारी; अभिनेत्रीच्या बोल्डनेसची होतीय चर्चा

विदेशात मिताली झाली बोल्ड; हॉट लूकची होतीये चर्चा
मराठी कलाविश्वातील गुणी आणि क्युट अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर (mitali mayekar). अभिनयासह मितालीला भटकंती करायचीही तितकीच आवड आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन ठिकाणांना भेट देते. यात खासकरुन ती विदेशवाऱ्या करते. सध्या मिताली अशाच एका ठिकाणी गेली असून विदेशात फिरण्याचा मनमुराद आनंद घेत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मिताली सध्या थायलंडमध्ये तिची सुट्टी एन्जॉय करतीये. या व्हेकेनशमधील अनेक फोटो, व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत येत आहे.
या व्हिडीओमध्ये तिने थायलंडमधील वेगवेगळी ठिकाणी, ती राहत असलेलं हॉटेल दाखवलं आहे. इतकंच नाही तर यावेळी तिने परिधान केलेले आऊटफिटही तितकेच चर्चेत येत आहेत. दरम्यान, मिताचीही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. यापूर्वीही मितालीने अनेक ठिकाणांना भेट दिली आहे.