प्रसिद्ध अभिनेत्रीचं पितृछत्र हरपलं; मेघना एरंडेच्या वडिलांचं निधन, भावनिक पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:02 IST2024-02-28T17:01:50+5:302024-02-28T17:02:31+5:30
Meghana erande: मेघनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचं पितृछत्र हरपलं; मेघना एरंडेच्या वडिलांचं निधन, भावनिक पोस्ट व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मेघना एरंडे (Meghana erande) हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. २७ फेब्रवारी रोजी तिच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. मेघनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मेघनाचे वडील सुधीर एरंडे यांचं पुण्यात निधन झालं असून संपूर्ण एरंडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मेघनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्या वडिलांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, मेघना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, वृत्तनिवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. आजवर मेघनाने अनेक कार्टून कॅरेक्टर्स, डब सिनेमांना तिचा आवाज दिला आहे. फार कमी वयात मेघनाने कलाविश्वात पदार्पण केलं आणि इंडस्ट्रीत तिचं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे तिच्या या सगळ्या वाटचालीमध्ये तिच्या वडिलांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे वडिलांच्या निधनामुळे ते कोलमडून गेल्याचं म्हटलं जात आहे.