आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:50 IST2023-08-22T13:49:31+5:302023-08-22T13:50:41+5:30
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यातबाबत जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते.

आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते. सेलिब्रेटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचा संपर्कात असतात. अनेकवेळा कलाकार सोशल प्लॅटफॉर्मवरुन आपल्या प्रेमाची अनेकवेळा कबुली देतात. आपल्या पार्टनरसोबतचा फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करतात. आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरील बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबुली केली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री मीरा जोशी आहे. मीराने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन बॉयफ्रेंडसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मीराच्या या फोटोवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. फोटोत मीरा जोशीचा हा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा आहे त्यामुळे तो नेमका आहे तरी कोण? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. अर्थात मिराने तिच्या या बॉयफ्रेंडचे नाव अजून गुपित ठेवले असून लवकरच ती त्याच्या नावाचा उलगडा करेल असे तिने सांगितले आहे.
मीरा जोशी ही अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहे. मीरा अनेक डान्सच्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यातूनच तिचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं. चालू द्या तुमचं, शिवा, वृत्ती, लाल बत्ती, माझ्या बायकोचा प्रियकर अशा अनेक चित्रपटातून मीराने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच मीराच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला होता. या अपघातातून ती सुखरूप बचावली होती मात्र तिच्या गाडीची अवस्था खूपच वाईट झाली होती. यानंतर मीराने अलीकडेच नवीकोरी गाडी खरेदी केली. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलं होते.