प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:52 IST2022-08-25T17:51:14+5:302022-08-25T17:52:16+5:30

Kshitee jog: सध्या सोशल मीडियावर क्षितीच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

marathi actress kshitee jog family photo viral on social media | प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो

प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो

कलाकारांचं प्रोफेशनल लाइफ प्रत्येक चाहता पाहात असतो. मात्र, त्या पलिकडेही जाऊन ही कलाकार मंडळी त्यांच्या पर्सनल आयुष्यात कसे राहतात, त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणत्या गोष्टी घडतात, त्यांचे कुटुंबीय कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच सध्या अभिनेत्री क्षिती जोग (kshitee jog)  हिच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात स्थान निर्माण करणाऱ्या क्षितीचे आई-वडील आणि नवरादेखील याच क्षेत्रात सक्रीय असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. अभिनेता अनंत जोग आणि अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची लेक असलेल्या क्षितीने अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेसोबत लग्न केलं आहे. त्यामुळे क्षितीशी संबंधित असलेल्या या तीनही दिग्गज व्यक्तींविषयी साऱ्यांना ठावूक आहे. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्तही तिची खूप मोठी फॅमिली आहे.

सध्या सोशल मीडियावर क्षितीच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचं मोठं कुटुंब दिसून येत आहे.  ''मी आणि माझे कुटुंब रंगले आनंदात...'', असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोमध्ये क्षिती आणि उज्ज्वला जोग यांचं एकत्रित मोठं कुटुंब पाहायला मिळतं.
 

Web Title: marathi actress kshitee jog family photo viral on social media