Hemangi kavi : सुष्मिता सेन समोर येताच हेमांगी कवी पडली तिच्या पाया, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:25 IST2022-11-19T13:51:00+5:302022-11-19T15:25:53+5:30
Hemangi Kavi :हेमांगी कवीने शेअर केलेला सुष्मिता सेनसोबतचा फोटो व्हायरल होतोय. सुष्मिताला मिठी मारताना हेमांगी काहीशी भावूक झालीय.

Hemangi kavi : सुष्मिता सेन समोर येताच हेमांगी कवी पडली तिच्या पाया, म्हणाली...
मराठी कलाविश्वात फार मोजक्या अशा अभिनेत्री आहेत ज्या समाजातील घटनांवर स्पष्टपणे त्यांचं मत मांडत असतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi Kavi).परखड मत मांडणारी, मनात येईल ते बोलणारी अशी तिची ओळख आहे. याचसोबतच तिचे फोटो आणि आगामी प्रोजेक्टबाबतची माहिती ही ती आपल्या चाहत्यांना देत असते. नुकताच तिनं सुष्मिता सेनसोबतच्या भेटीचे सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेमांगी सुष्मिता सेनसोबत ताली या बहुचर्चित वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. हेमांगीनं तालीच्या सेटवरील सुष्मिता सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत हेमांगी सुष्मिता मिठी मारताना दिसतेय. तसेच यावेळी ती काहीशी भावूक झाल्याचं दिसतेय. हेमांगीने सुष्मिताच्या पाय पडून आशीर्वाद देखील घेतला.
'हॅप्पी बर्थडे माय दुर्गा' म्हणत सुश्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रेटींसह चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स केलं आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'ताली'मध्ये सुश्मिता गौरी शिंदे-सावंतच्या भूमिका साकारणार आहे. ट्रान्सजेंडर गौरी सावंत या एक कार्यकर्त्या आहेत, ज्या विक्सच्या जाहिरातीत झळकल्या होत्या. या जाहिरातीत त्या एका लहान मुलीसोबत दिसल्या होत्या. गौरी यांच्या या जाहिरातीची बरीच चर्चा झाली होती. हेमांगी नेमकी कुणी भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.