VIDEO: ओढ गावाची! देवीच्या जत्रेसाठी छाया कदम यांनी गाठलं कोकण; साधेपणाचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 08:56 IST2025-11-20T08:50:08+5:302025-11-20T08:56:22+5:30
कोकणातील गावी पोहोचल्या छाया कदम, शेअर केले देवीच्या जत्रेतील खास क्षण, म्हणाल्या-"गाव आणि मी..."

VIDEO: ओढ गावाची! देवीच्या जत्रेसाठी छाया कदम यांनी गाठलं कोकण; साधेपणाचं होतंय कौतुक
Chhaya Kadam Video: 'फॅंड्री', 'सैराट', 'झुंड', 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'लापता लेडीज' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदम यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने स्वतःचं वेगळंपण सिद्ध केलं आहे. एकापेक्षा एक असे उत्तम प्रोजेक्ट्स करत त्यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे.छाया कदम या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असल्याच्या पाहायला मिळतात. त्याद्वारे आपले प्रोजेक्ट्स आणि दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. छाया कदम या आपल्या कामातून ब्रेक घेत गावी रमल्याचं पाहायला मिळतंय.कोकणातील धामापूर हे छाया कदम यांचं मूळ गाव आहे. नुकतीच त्यांनी आपल्या गावी भेट दिली असून या भेटीचे क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सध्या छाया कदम या त्यांच्या सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेसाठी गेल्या आहेत. या जत्रेचे व्हिडीओ त्यांनी अपल्या सोशल मीडियादावर शेअर केला आहे.
या व्हिडीओद्वारे त्यांनी देवीची पालखी आणि जत्रेत केले जाणारे पारंपरिक लोककलाप्रकार आपल्या चाहत्यांना दाखवले आहेत. अगदी सामान्य माणसाप्रमाणे छाया कदम यांनी या जत्रेत सहभाग घेतला आणि त्यांचा हाच साधेपणा अनेकांना भावला आहे.एवढी मोठी सेलिब्रिटी असून मातीशी जोडून राहण्याचा त्यांच्या या स्वभाव गुणांचं सगळेच कौतुक करत आहेत.