VIDEO : नमो नमो शंकरा! महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर महादेवाच्या भक्तीत तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:47 IST2025-02-26T10:43:10+5:302025-02-26T10:47:59+5:30

आज सर्वत्र महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

marathi actress amruta khanvilkar post for mahashivratri 2025 seek blessings at temple shared video | VIDEO : नमो नमो शंकरा! महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर महादेवाच्या भक्तीत तल्लीन

VIDEO : नमो नमो शंकरा! महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर महादेवाच्या भक्तीत तल्लीन

Amruta Khanvilkar: आज सर्वत्र महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी शिवभक्त यादिवसाची आतुरतेने वाट बघत असतात, त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी आणि आराधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. दरम्यान, या महाशिवरात्रीचं औचित्य साधत अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) महादेवाचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओतिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर महादेवाचं दर्शन घेतल्याचं समाधान स्पष्टपणे दिसतं आहे.


अभिनेत्री अमृता खानविलकर महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबरत आपल्या मनातल्या भावना तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या.या पोस्टमध्ये तिने लिहलं की, तू ही शून्य हैं ….तुही शिवाय, महाशिवरात्री की शुभकामनाएँ... अशी पोस्ट तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अमृता खानविलकरने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमृता खानविलकरने तिच्या अभिनयासह नृत्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अलिकडेची ती 'संगीत मानापमान' सिनेमात झळकली होती. यात तिने केमिओ केला होता. या सिनेमात तिने केलेला डान्स चाहत्यांना खूप भावला आहे. याशिवाय ती 'धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज' सिनेमात महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती.

Web Title: marathi actress amruta khanvilkar post for mahashivratri 2025 seek blessings at temple shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.