अलका कुबल यांचं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन; सिद्धार्थ चांदेकरसह शेअर करणार स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:17 IST2022-07-13T13:17:10+5:302022-07-13T13:17:49+5:30
Alka kubal: अलका कुबल यांचा हळूहळू सोशल मीडियावरील वावरही वाढत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट किंवा सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात.

अलका कुबल यांचं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन; सिद्धार्थ चांदेकरसह शेअर करणार स्क्रीन
'माहेरची साडी','चार दिवस सासूचे', 'वहिनीची माया' अशा कितीतरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे कलाविश्वात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. बराच काळ रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता. मध्यंतरी 'आई माझी काळुबाई' (aai mazi kalubai) या मालिकेत त्या झळकल्या. त्यानंतर आता पुन्हा त्या रुपेरी पडद्याकडे वळल्या आहेत.
अलका कुबल यांचा हळूहळू सोशल मीडियावरील वावरही वाढत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट किंवा सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या टीमसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे.
लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हे तीन कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, या चित्रपटाची कथा काय असेल, हे कलाकार कोणत्या भूमिका साकारणार असे कित्येक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहे.