Photo: अलका कुबल यांचा रॉयल कारभार; राजेशाही थाट केलं फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:20 IST2023-03-26T18:19:58+5:302023-03-26T18:20:44+5:30
Alka kuba: अलका कुबल कलाविश्वासह सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या सिनेमा, मालिका यांचे अपडेट देत असतात.

Photo: अलका कुबल यांचा रॉयल कारभार; राजेशाही थाट केलं फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). अलका कुबल यांनी रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. अलका कुबल यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं असून सध्या त्यांचा ऐतिहासिक लूक चर्चेत येत आहे.
अलका कुबल कलाविश्वासह सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या सिनेमा, मालिका यांचे अपडेट देत असतात. यावेळी त्यांनी त्यांचा रॉयल लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहेत.
अलका कुबल यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तसंच भरपूर दागदागिने परिधान केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राजमाता जिजाऊ यांचा लूक केला असून त्या गेटअपमध्ये फोटोशूट केलं आहे.
दरम्यान, अलका कुबल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी 'माहेरची साडी', 'कमाल माझ्या बायकोची', 'कुंकू लावते माहेरचं','काळुबाईच्या नावाने चांगभलं', अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, अलिकडेच त्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेत झळकल्या होत्या.