Feeling loved!! ऐश्वर्या नारकरचा प्रेमात पाडणारा 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:59 IST2022-03-16T17:59:15+5:302022-03-16T17:59:36+5:30
Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकर यांचं साडीप्रेम साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा त्या साडी नेसून सुंदर फोटोशूट करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असंच एक छान फोटोशूट केलं आहे.

Feeling loved!! ऐश्वर्या नारकरचा प्रेमात पाडणारा 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच
वय हा निव्वळ आकडा असतो हे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी दाखवून दिलं आहे. वयाची ५० पार केल्यानंतरही फिटनेस, सौंदर्य आणि ग्लॅमरस यामुळे ऐश्वर्या कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. कलाविश्वाप्रमाणेच ऐश्वर्या सोशल मीडियावरही सक्रीय आहेत.त्यामुळे अनेकदा त्या त्यांचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीदेखील त्यांनी मन मोहून टाकणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणीही त्यांच्या प्रेमात सहज पडले हे दिसून येतं.
ऐश्वर्या नारकर यांचं साडीप्रेम साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा त्या साडी नेसून सुंदर फोटोशूट करत असतात. यावेळीदेखील त्यांनी असंच एक छान फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटच्या वेळी त्यांनी एक व्हिडीओदेखील काढला आहे. हा व्हिडीओ शेअर करत साडी प्रेम असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स, नजाकततादेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
ऐश्वर्या नारकरच्या लेकाला कधी पाहिलंय? आईइतकाच दिसतो देखणा
दरम्यान, ऐश्वर्या नारकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ऐश्वर्या नारकर यांच्याप्रमाणेच त्यांचे पती अविनाश नारकरदेखील प्रसिद्ध अभिनेता असून ही कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते.