अखेर ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं ब्युटी सिक्रेट; बीटापासून तयार केलेल्या 'या' पदार्थाचं करतात सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 16:24 IST2023-09-20T16:23:59+5:302023-09-20T16:24:36+5:30

Aishwarya narkar: 'या' हेल्दी पदार्थामुळे ऐश्वर्या नारकर अजूनही फिट आहेत.

marathi actress aishwarya narkar share her beauty secret | अखेर ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं ब्युटी सिक्रेट; बीटापासून तयार केलेल्या 'या' पदार्थाचं करतात सेवन

अखेर ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं ब्युटी सिक्रेट; बीटापासून तयार केलेल्या 'या' पदार्थाचं करतात सेवन

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर ( aishwarya narkar). दमदार अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वयाची पन्नास वर्ष पार केल्यानंतरही त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य अबाधित आहे. त्यामुळे त्यांच्या सौदर्याचं नेमकं रहस्य काय असा प्रश्न कायम चाहते विचारत असतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत त्यांचं ब्युटी सिक्रेट शेअर केलं आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेल्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही कमालीच्या अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे काही व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात. यात खासकरुन त्या योगा, ट्रेंडिंग रिल असे व्हिडीओ पोस्ट करत असतात. परंतु, यावेळी त्यांनी त्यांचं ब्युटी सिक्रेट सांगितलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या बीटरुट सब्जी म्हणजे बीटाची भाजी करत आहेत. या भाजीची रेसिपी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.  त्यांच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सने कमेंट करत कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: marathi actress aishwarya narkar share her beauty secret