भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 13:59 IST2024-06-30T13:55:55+5:302024-06-30T13:59:15+5:30

राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

marathi actress Aditi Dravid s special post for uncle Rahul Dravid after India s historic win T20 WC | भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

भारताच्या विजयानंतर अभिनेत्री अदिती द्रविडची काकासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकदम परफेक्ट..."

संपूर्ण देशवासियांसाठी कालचा दिवस ऐतिहासिकच होता. टीम इंडियाने T20 World cup पटकावत सर्व भारतीयांचं मन जिंकलं. काल सगळीकडे जल्लोषाचं वातावरण होतं. प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा कॅप्टन रोहित शर्मा, रनमशीन विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इतर सर्वच प्लेयर्सवर कौतुकाचा वर्षाव करत होता. यामध्ये कोच राहुल द्रविडचं योगदान अतिशय मोलाचं आहे. तसंच राहुल द्रविडसाठी क्रिकेटरसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे. राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अदितीने तिचे बाबा विनायक द्रविड आणि काका राहुल द्रविड यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. राहुल द्रविडसारखा ग्रेट माणूस हा अदितीचा काका असल्याने तिला कायमच अभिमान आहे. अदिती लिहिते, 'धन्यवाद कोच! तू त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलंस. एकदम योग्य शेवट झाला. या फेअरवेलसाठी तू पात्र आहे. तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. THE WALL. माझ्या आयुष्यातील या दोन बेस्ट MEN साठी मी कायम आभारी आहे."

अदितीने आणखी एका पोस्टमध्ये राहुल द्रविडचा ट्रॉफीसोबतचा व्हिडिओ शेअर केला. हा क्षण संपूर्ण जगाने अनुभवला. भारतीयांच्या मनात आपसूकच आनंदाश्रू आले. त्यात प्रशिक्षक राहुल द्रविड आपला काका आहे म्हणल्यावर आदितीला आणखी अभिमान वाटत आहे. 

राहुल द्रविड अदितीचा चुलत काका आहे. खुद्द अभिनेत्रीनेच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना याचा खुलासा केला होता. दरम्यान, अदितीने मालिकांबरोबरच नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे अदिती चर्चेत आली होती. या सिनेमातील लोकप्रिय ठरलेलं 'मंगळागौर' हे गाणं अदितीने लिहिलं आहे. या गाण्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 

Web Title: marathi actress Aditi Dravid s special post for uncle Rahul Dravid after India s historic win T20 WC