प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:21 IST2025-02-06T15:20:28+5:302025-02-06T15:21:48+5:30

मराठी अभिनेत्रीने प्रयागराज गाठलं आहे. प्रयागराजला गेल्यानंतर एअरपोर्टवरच तिची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे.

marathi actress aditi dravid met neena gupta at prayagraj airport shared post | प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..."

प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- "निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की..."

महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराज चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सौरभ चौगुले प्रयागराजला गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला होता. आता मराठी अभिनेत्रीने प्रयागराज गाठलं आहे. प्रयागराजला गेल्यानंतर एअरपोर्टवरच तिची बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी भेट झाली. याचा अनुभव तिने शेअर केला आहे. प्रयागराजला गेलेली ही अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड आहे. 

अदितीने नीना गुप्ता यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे. "प्रयागराज जर्नीची सुरुवात अशी झाली...माझ्या आवडत्या नीना गुप्ता यांची भेट झाली. आणि हो! सगळ्या निर्माते आणि दिग्दर्शकांना मी सांगू इच्छिते की मी एक गुणी अभिनेत्री असून मुंबईत राहते. चांगल्या कामाच्या शोधात आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


पुढे नीना गुप्तांबाबत ती म्हणते, "या माझ्या आवडत्या व्यक्ती आहेत. फक्त त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांनी ज्या धैर्याने गोष्टी केल्या आहेत त्यासाठी. २०१७ मध्ये त्यांनी केलेलं ट्वीट अनेकांसाठी प्रेरणा होती. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांसाठी जे रोज ऑडिशन देतात, कष्ट करतात, तरीही रिजेक्शन मिळतं! प्रयत्न करत राहा, तुमचा फ्रायडे नक्कीच येईल". 

Web Title: marathi actress aditi dravid met neena gupta at prayagraj airport shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.