विजय पाटकरसोबत रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, मालिकाविश्वात गाजवलाय अभिनयाचा डंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 11:48 IST2023-10-01T11:46:49+5:302023-10-01T11:48:02+5:30
दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

विजय पाटकरसोबत रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, मालिकाविश्वात गाजवलाय अभिनयाचा डंका
प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar)विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. मराठीत आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारे विजय पाटकर यांनी अनेक हिंदी सिनेमातही आपलं कौशल्य दाखवलं आहे. फक्त अभिनेताच नाही तर ते दिग्दर्शक आणि निर्माताही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. आता लवकरच विजय पाटकर पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. आगामी 'दिल दोस्ती दिवानगी' सिनेमात त्यांची रोमँटिक भूमिका आहे. तर या सिनेमात त्यांच्यासोबत झळकणारी अभिनेत्री कोण माहितीये का?
मराठी सिनेमा 'दिल दोस्ती दिवानगी' लवकरच प्रदर्शित होतोय. प्रेम, मैत्री या विषयावर सिनेमा आधारित आहे. यामध्ये विजय पाटकर यांचाही रोमँटिक अँगल आहे. तर त्यांच्यासोबत सुरेखा कुडची ही अभिनेत्री झळकणार आहे. दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांची लव्हस्टोरी यात दाखवली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विनोदी अभिनेता रोमँटिक भूमिकेत दिसणार आहेत.
सुरेखा कुडची या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि लावणी परफॉर्मर आहेत. ९० च्या दशकात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमात काम केले आहे. 'रुंजी','तुझ्या रुपाचं चांदणं','नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.'दिल दोस्ती दिवानगी' १३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये चिराग पाटील, कश्यप परुळेकर, स्मिता गोंदकर, वीणा जगताप, विजय पाटकर, आणि सुरेखा कुडची यांच्या मुख्य भूमिका आहेत.