पुन्हा एकदा चाहते पडले वैभव तत्ववादीच्या प्रेमात; 'तू चंचला, तू कामिनी'वर फॉलो केल्या हटके डान्स स्टेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:54 IST2024-03-29T12:54:30+5:302024-03-29T12:54:51+5:30

Vaibhav tatwawadi: नुकताच वैभवने इन्स्टाग्रामवर त्याचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

marathi-actor-vaibhav-tatwawadi-share-dance-video-on-tu chanchala tu kamini song | पुन्हा एकदा चाहते पडले वैभव तत्ववादीच्या प्रेमात; 'तू चंचला, तू कामिनी'वर फॉलो केल्या हटके डान्स स्टेप

पुन्हा एकदा चाहते पडले वैभव तत्ववादीच्या प्रेमात; 'तू चंचला, तू कामिनी'वर फॉलो केल्या हटके डान्स स्टेप

मराठी कलाविश्वातील हँडसम हंक अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav tatwawadi). उत्तम अभिनय कौशल्य आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर वैभवने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. इतकंच नाही तर त्याचा फिमेल फॅन फॉलोअर्सदेखील प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. वैभव सोशल मीडियावर सक्रीय असून तो वरचेवर त्याचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतो.

नुकताच वैभवने इन्स्टाग्रामवर त्याचा लेटेस्ट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे. वैभवने तू चंचला, तू कामिनी या गाजलेल्या मराठी गाण्यावर ठेका धरला आहे. मात्र, त्याने हटके डान्स स्टाइल करत चाहत्यांची वाहवाह मिळवली आहे. वैभवचे डान्स व्हिडीओ कायम त्याच्या डान्स स्टेप, गाण्याची निवड आणि लोकेशन यांच्यामुळे चर्चेत येत असतात.

दरम्यान, वैभवच्या या व्हिडीओवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. वैभव लोकप्रिय अभिनेता असून त्याने मराठीसह बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती.

Web Title: marathi-actor-vaibhav-tatwawadi-share-dance-video-on-tu chanchala tu kamini song