मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:05 IST2025-06-21T10:05:08+5:302025-06-21T10:05:28+5:30

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे.

Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Death: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेने त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तुषार घाडीगावकरच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

अंकुर वाढवेने इंस्टाग्रामवर तुषार घाडीगावकरचा फोटो शेअर करत त्याच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की,''मित्रा का? कश्यासाठी? कामं येतात जातात! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो.''


अभिनेता तुषार घाडीगावकरने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने हिंदीतही काम केले आहे. तसेच काही जाहिरातींमध्येही तो झळकला होता. त्याने लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड , झोंबिवली, हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे.

 

Web Title: Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work