"जे लांब आहेत त्यांना जवळ यायचंय, जे जवळ आहेत...", सिद्धार्थ चांदेकरची कविता ऐकून डोळ्यांत येईल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:31 IST2025-01-14T18:31:16+5:302025-01-14T18:31:45+5:30
"रक्ताचं नातं आहे, असं कसं तुटेल?", सिद्धार्थ चांदेकरची भावुक करणारी कविता

"जे लांब आहेत त्यांना जवळ यायचंय, जे जवळ आहेत...", सिद्धार्थ चांदेकरची कविता ऐकून डोळ्यांत येईल पाणी
सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेका मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने नात्यांवर भाष्य करणारी आजच्या परिस्थितीला अनुसरूण असणारी एक कविता शेअर केली आहे.
सिद्धार्थ चांदेकरची 'असं कसं तुटेल?' कविता
गंमत बघा ना
जे लांब आहेत त्यांना जवळ यायचंय,
जे जवळ आहेत त्यांना लांब जायचंय...खूप काही बोलून बसलो म्हणून काही जण भित्यात,
थोडं तरी बोलायला हवं होतं म्हणून काही लोक पचतावत्यात...इन्स्टास्टोरी बघायला तयार आहे
पण, खरी स्टोरी ऐकायला तयार नाही...मीच हा घ्यायचा पुढाकार हा प्रश्न काहींना,
तर मी का घेतली माघार हा प्रश्न काहींना...आठवणींची जागा अहंकाराने कधी घेतली?
जिथे ओलावा होता, तिथे ठिणगी कधी पेटली?मान्य आहे काही विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा आवरता येत नाहीत
पण, एकदा ठेच लागली म्हणून काही परत सावरता येत नाहीलपवलेला तुकडा लावून बघा कोडं आपोआप सुटेल,
रक्ताचं नातं आहे ना असं कसं तुटेल??
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही कविता शेअर केली आहे. "असं कसं तुटेल? कविता कशी वाटली सांगा. आणि ज्यांच्याशी बोलायचं राहिलं आहे, त्यांना पाठवा!", असं कॅप्शन त्याने दिलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, सिद्धार्थचा 'फसक्लास दाभाडे' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासह क्षिती जोग, अमेय वाघ, मिताली मयेकर, निवेदिता सराफ अशी स्टारकास्ट आहे. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २४ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.