'मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण एक वेगळीच ऊर्जा...'; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:21 IST2023-06-15T15:21:12+5:302023-06-15T15:21:35+5:30
Santosh juvekar: अलिकडेच संतोषने उज्जैनमधील महाकाल आणि कालभैरवनाथ यांचं दर्शन घेतलं. या देवांचं दर्शन घेतल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.

'मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण एक वेगळीच ऊर्जा...'; संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
मराठी कलाविश्वातील डॅशिंग आणि गुणी अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर( Santosh juvekar) . कलाविश्वासह समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर तो उघडपणे व्यक्त होत असतो. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट कायम चर्चेत येतात. यात अलिकडेच त्याने उज्जैनमधील महाकाल आणि कालभैरवनाथ यांचं दर्शन घेतलं. या देवांचं दर्शन घेतल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने देवावर असलेल्या श्रद्धेवर भाष्य केलं आहे.
काय संतोषची पोस्ट?
आमच्या महेश दादामुळे सध्या अनेक देवस्थानांच्या दर्शनांच पुण्य मला मिळतय. काल पहिल्यांदा उज्जैन येथे महाकाल आणि काल भैरवनाथचे दर्शन घेतलं. अगदी अभिषेक सुद्धा करायला मिळाला. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्याच्या गाभाऱ्यात तशीच ऊर्जा मला अनेक मंदिरात जाणवली आहे मी चर्चमधे सुद्दा जातो गोव्यात गेलो की काही जुनी चर्च आहेत मला आवडत जायला.मी दरग्यातही जातो नाशिकहून ठाण्याकडे येताना घाट संपला की डाव्या बाजूला एक दर्गा आहे मी नचूकता आणि नचूकवता त्या दरग्यात जातोच जातो त्या चर्च आणि दरग्यातही मला तीच ऊर्जा जाणवते आणि ती सकारात्मक ऊर्जा कायम आपल्या सोबत रहावी ही प्रार्थना मी करतो कायम. पण मला आज त्या मंदिरातल्या देवाला त्या चर्च मधल्या येशूला आणि त्या दरग्यातल्या अल्ल्हाला सांगायचंय तुझ्या गाभाऱ्यात ही जी सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण विश्वात भरुदे हा सुद्धा तुझाचतर गाभारा आहेना.
दरम्यान, संतोषसोबत यावेळी आकाश ठोसरदेखील होता. आकाशने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर या मंदिरातील काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. ही जोडी लवकरच एका नव्या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.