...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: July 11, 2025 17:42 IST2025-07-11T17:40:53+5:302025-07-11T17:42:09+5:30
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पुण्याच्या प्रयोगाला घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना वाचून तुम्हीही अभिनेत्याचं कौतुक कराल

...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण सध्या दोन नाटकांद्वारेमराठी रंगभूमीवर काम करत आहे. 'नियम व अटी लागू' आणि 'कुटुंब कीर्ररतन' ही संकर्षणची दोन्ही नाटकं मराठी रंगभूमीवर हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहेत. संकर्षण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. संकर्षणने असाच एक अनुभव शेअर केलाय. यावेळी वृद्धाश्रमातील दोन आजी संकर्षणला भेटायला आल्या. पुढे काय घडलं बघा.
८० वर्षांच्या आजी भेटायल्या आल्या अन्..
संकर्षणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन संकर्षण लिहितो, "आज पुण्यात “नियम व अटी लागू…” प्रयोगाआधी २ आज्ज्या आल्या… दोघीही वयाने ८० आसपास असतील… मला वाटलं प्रयोगाला आल्या असतील … तर म्हणाल्या “आम्ही वृद्धाश्रमात राहातो आम्हाला वेळत परत गेलं पाहिजे… आणि ३ तास आम्ही तब्येतीमुळे बसू शकत नाही पण तुला फक्त भेटायला आलोय”. भरभरून बोलल्या… आशीर्वाद दिले … आणि निघून गेल्या… फक्त भेटीसाठी आॅटो करुन आल्या होत्या… मी मुद्दाम जातांना त्यांना माझ्या गाडीने पाठवलं … फार गोड वाटलं…"
अशाप्रकारे संकर्षणने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना घरं पाठवलं, या कृतीचं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं. संकर्षण नाटकादरम्यान भेटलेल्या चाहत्यांचे असेच भन्नाट अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. संकर्षणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दोन मराठी नाटकांमध्ये काम करतोय. याशिवाय 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत संकर्षणने श्रेयस तळपदेच्या मित्राची भूमिका साकारली होती.