बेसूर म्हणत 'या' व्यक्तीने केला होता महागुरुंचा अपमान; सचिन यांच्या गाण्याची उडवली होती खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:44 AM2024-01-25T10:44:40+5:302024-01-25T10:45:06+5:30

Sachin pilgaonkar: सचिन यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला.

marathi-actor-sachin-pilgaonkar-story-of-turning-into-singer-and-his-latest-chaupai-singing-video-watch | बेसूर म्हणत 'या' व्यक्तीने केला होता महागुरुंचा अपमान; सचिन यांच्या गाण्याची उडवली होती खिल्ली

बेसूर म्हणत 'या' व्यक्तीने केला होता महागुरुंचा अपमान; सचिन यांच्या गाण्याची उडवली होती खिल्ली

मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणजे सचिन पिळगांवकर (sachin pilgaonkar). संगीत, दिग्दर्शन, लेखन अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांची लोकप्रियता अफाट आहे. मात्र, कलाविश्वात प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याचा त्याच्याच घरातल्या एका व्यक्तीने प्रचंड मोठा अपमान केला होता. या अपमानामुळे सचिन पिळगांवकर चांगलेच पेटून उठेले आणि त्यांनी या अपमानाचं सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलं.

news18marathi ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सचिन पिळगांवकर यांनीच हा घडलेला किस्सा सांगितला होता.  सचिन पिळगांवकर आज उत्तम गायक म्हणूनही ओळखले जातात. परंतु, एकदा त्यांच्या गाण्याची त्यांच्या मामानेच खिल्ली उडवली होती. त्यांच्या मामाने त्यांनाच चक्क बेसूर म्हटलं होतं. या अपमानामुळे खजील झालेल्या महागुरुंनी गाणं शिकायचा चंग बांधला आणि गायक होऊन दाखवलं.

सचिनला बेसूर का म्हटला होता मामा?

सचिन पिळगांवकर यांचे आई-वडील दोघंही उत्तम गायक होते. एकदा सचिन त्यांच्या आजोळी गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या आईसोबत गाणं म्हणायला बसले. यावेळी सचिन यांचा आवाज ऐकून त्यांचा मामा त्यांना बेसूर म्हणाला. इतकंच नाही तर त्याने सचिन यांना गाणं थांबवायलाही सांगितलं.

अपमान जिव्हारी लागला

सगळ्यांसमोर मामाने बेसूर म्हटल्यामुळे सचिन यांच्या जिव्हारी हा अपमान लागला. त्यामुळे त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षी गाणं शिकायचा चंग बांधला. विशेष म्हणजे आज संगीत विश्वात त्यांचं नाव घेतलं जातं. मामाने केलेल्या अपमानामुळे माझ्या आयुष्यात गाणं आलं. तसा मी खूप जिद्दी आहे. एखादी गोष्ट ठरवली की ती करतोच. तसं गाणंही मी जिद्दीनं शिकलो” असं म्हणत सचिन पिळगांवकरांनी ही आठवण सांगितली.

Web Title: marathi-actor-sachin-pilgaonkar-story-of-turning-into-singer-and-his-latest-chaupai-singing-video-watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.