"आवाज आणि माज तुमच्या घरी...", महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणाऱ्यांवर अभिनेता संतापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:20 IST2025-04-02T16:18:14+5:302025-04-02T16:20:47+5:30

"आवाज आणि माज तुमच्या घरी..." पुष्कर जोगची संतप्त प्रतिकिया; म्हणाला- "मराठी येत नसेल तर..."

marathi actor pushkar jog got angry at those who do not speak marathi despite living in maharashtra shared post | "आवाज आणि माज तुमच्या घरी...", महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणाऱ्यांवर अभिनेता संतापला

"आवाज आणि माज तुमच्या घरी...", महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणाऱ्यांवर अभिनेता संतापला

Pushkar Jog: पुष्कर जोग (Pushkar Jog) हा मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयासह पुष्कर विविध चित्रपटांची निर्मितीदेखील करताना दिसत आहे. सध्या तो हार्दिक शुभेच्छा या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान पुष्कर जोग हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. विविध मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून तो विविध विषयांवर भाष्य करत असतो. आता नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अलिकडेच पवई येथे आयटी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला. मराठीत बोलणार नाही म्हणत 'मराठी गया तेल लगाने' अशी अरेरावी केली. या संदर्भात अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे. 

नुकतीच पुष्कर जोगने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामध्ये पुष्करने लिहिलंय की, "राहता इथे, पेसै कमवता इथे..., मराठी येत नसेल तर शिका. पण, आवाज आणि माज तुमच्या घरी, तुमच्या राज्यात..." अशी लक्षवेधी पोस्ट अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, पुष्कर जोग 'हार्दिक शुभेच्छा' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे प्रमुख भूमिकेत आहे. कलाविश्वात त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Web Title: marathi actor pushkar jog got angry at those who do not speak marathi despite living in maharashtra shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.