प्रसाद ओकच्या लेकाचा परदेशात पदवी प्रदान सोहळा, युझरने केली टीका; पत्नीनं दिलं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:39 IST2023-11-22T15:38:15+5:302023-11-22T15:39:32+5:30
मुलाला भारत सोडून परदेशात शिकण्यासाठी का पाठवले अशी खोचक टीका एका नेटकऱ्याने केली.

प्रसाद ओकच्या लेकाचा परदेशात पदवी प्रदान सोहळा, युझरने केली टीका; पत्नीनं दिलं सडेतोड उत्तर
मराठी अभिनेता प्रसाद ओकचा (Prasad Oak) मुलगा सार्थक ओकने नुकतंच त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याने जर्मनीत शिक्षण घेतलं असून नुकताच त्याचा पदवी प्रदान समारंभ पार पडला. या समारंभासाठी प्रसाद ओक पत्नी मंजिरी (Manjiri Oak)आणि धाकटा मुलगा मयांकसह पोहोचला. सार्थकला पदवी स्वीकार करताना दोघांना खूपच अभिमान वाटत होता. मात्र मुलाला भारत सोडून परदेशात शिकण्यासाठी का पाठवले अशी खोचक टीका एका नेटकऱ्याने केली. या नेटकऱ्याला मंजिरी ओकने सडेतोड उत्तर दिलं आहे.
मंजिरी ओकने सार्थकचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने पदवी तो कॉन्वेकेशनच्या आऊटफिटमध्ये दिसतोय. 'कमाल क्षण, कमाल अनुभव, कमाल भावना...आयुष्याचं सार्थक झालं.' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
मंजिरीच्या या पोस्टवर एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिले,'भारतातले सगळे श्रीमंत लोकं परदेशात का जातात उच्च शिक्षणासाठी ? भारतात डेवलपमेंट करत का नाहीत ?' यावर मंजिरीने सडेतोड उत्तर देत लिहिले,'आमच्या आनंदात तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर प्लीज आम्हाला अनफॉलो करा. पण कोणता तरी भलताच विषय काढून नजर लावू नका आणि समाजात निगेटिव्हिटी पसरवू नका.'
इतकंच नाही तर आणखी एका युझरने पोस्टवर खोचक कमेंट केली आहे. 'परदेशात शिक्षण फक्त श्रीमंतांच्या मुला मुलींनी घ्यायचे असते! हे आज पुन्हा सिद्ध झालं...!' प्रसाद ओकच्या लेकाच्या पदवी समारंभावर नेटकऱ्यांनी मात्र निशाणा साधला आहे.