प्रसाद ओक लेकाला भेटण्यासाठी पोहोचला परदेशात, कुटुंबीयांसोबतचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 15:53 IST2023-11-10T15:51:11+5:302023-11-10T15:53:53+5:30
प्रसादचा मुलगा सार्थक ओक सध्या परदेशात असतो.

प्रसाद ओक लेकाला भेटण्यासाठी पोहोचला परदेशात, कुटुंबीयांसोबतचे फोटो केले शेअर
मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही क्षेत्रात डंका गाजवत आहे. बहुगुणी अभिनेता प्रसाद आगामी 'धर्मवीर 2' मुळेही चर्चेत आहे. तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये तो परिक्षक आहे. प्रसाद कामासोबत कुटुंबाबरोबरही वेळ घालवत असतो. नुकतंच तो परदेशात फिरायला गेला होता. त्याचा मुलगा सार्थकला भेटायला त्याने बायकोसाबत ही टूर केली. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रसादला मयांक आणि सार्थक ही दोन मुलं आहेत. सार्थक सध्या परदेशात आहे. त्यालाच भेटण्यासाठी प्रसाद बायको आणि मयांकसोबत फॅमिली हॉलिडेवर गेला होता. मुलाची भेट आणि फॅमिली टूर असं एकत्रितच झालं. 'फॅमिली टूर...लवकरच भेटू सार्थक' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. विशेष म्हणजे प्रसादने बिझनेस क्लासमधून विमानप्रवास केलाय. विमानातील फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघंही नवरा बायको कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहेत.
प्रसादच्या या फोटोंवर कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. क्षितीज दातेने तर 'अगदी बारीक दिसतोय' अशी कमेंट केली आहे. प्रसाद सध्या 'धर्मवीर 2' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसंच त्याने 'जिलबी' या आणखी एका सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.