सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 12:44 IST2023-06-14T12:44:20+5:302023-06-14T12:44:55+5:30

Prasad Oak: प्रसाद आज प्रचंड यश, संपत्ती उपभोगत आहे. त्यामुळे तो एखाद्या लॅव्हिश घरात राहत असेल असं अनेकांना वाटतं.

marathi actor Prasad Oak house tour video | सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video

सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक (prasad oak). आपल्या दर्जेदार सिनेमांसाठी ओळखला जाणारा प्रसाद आज लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. प्रसादने अथक परिश्रम करुन कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते. आज प्रसादचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या त्याच्या घराचा इनसाईड व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रसाद आज प्रचंड यश, संपत्ती उपभोगत आहे. त्यामुळे तो एखाद्या लॅव्हिश घरात राहत असेल असं अनेकांना वाटतं. मात्र, प्रसाद आजही एका सामान्य व्यक्तीसारखा राहतो. कुठेही बडेजावपणा न करतो तो फार साधेपणाने राहतो. त्याचा हाच साधेपणा त्याच्या घरातही पाहायला मिळतो.

मंजिरी नव्हे तर 'हे' आहे प्रसाद ओकचं पहिलं प्रेम; आजही त्यावर करतो तितकंच प्रेम

दरम्यान, प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी यांनी अत्यंत साधेपणाने पण तितकंच सुबक पद्धतीने त्यांचं घर सजवलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केल्याचं लक्षात येतं. तसंच प्रसादने त्याच्या दोन्ही मुलांनाही साधेपणाने जीवन जगण्याची शिकवण दिली आहे.

अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रसाद आज लोकप्रिय दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. प्रसादचा चंद्रमुखी हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने तुफान कमाई केली.
 

Web Title: marathi actor Prasad Oak house tour video