"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:07 IST2025-10-04T16:06:33+5:302025-10-04T16:07:43+5:30
Pavan Choure And Gautami Patil : अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.

"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे अडचणीत सापडली आहे. वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रिक्षाला धडक दिली. ही कार गौतमीच्या नावावर आहे. त्यात रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला नोटीसही बजावली. याच दरम्यान मराठी अभिनेत्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहे. मग तू काय गोरगरीब जनतेला ही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का?….तुझी कार एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस. परत तुझ्या गाडीत कोण कोण होत हे ही तुलाच माहीत. पोलीस यायच्या आधी तुझी गाडी उचली जाते, प्रकरण दाबण्यासाठी."
"बिचाऱ्या रिक्षा चालकाला किती लागलंय, त्याच काय झालंय? चौकशी न करता पळ काढता कारण तुझे काळे धंदे बाहेर येतील म्हणून. आज रिक्षा चालक दीनानाथ रुग्णालयात व्हेंटीलेटरवर आहे. या घटनेला चार दिवस झाले तरी तू साधं एक माणुसकीच्या नात्याने विचारपूस पण केली नाहीस. हेच तुझे संस्कार का? एक गोष्ट लक्ष्यात ठेव, एक सामान्य माणूस जेवढा वरती घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो... तुझ्या या कृत्याचा जाहीर निषेध…" असं पवनने म्हटलं आहे.
"गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. या अपघातातील जखमी रिक्षाचालक याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नाही असा आरोप जखमी रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला. या नातेवाईकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली. या वाहनात गौतमी पाटील होती की नव्हती, संबंधित चालकाला अटक करा, वाहन जप्त करा असं चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना सांगितले. त्याशिवाय रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च गौतमीला करायला लावा असंही पाटील यांनी म्हटलं.