मकरंद अनासपुरेंच्या मुलांना पाहिलंत का? दिसायला अगदी हुबेहूब; पहिल्यांदाच एकत्र दिसलं कुटुंब, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:03 IST2026-02-14T13:00:37+5:302026-02-14T13:03:28+5:30
मकरंद अनासपुरेंच्या मुलांना पाहिलंत का? पहिल्यांदाच एकत्र दिसलं कुटुंब, फोटो होतायेत व्हायरल

मकरंद अनासपुरेंच्या मुलांना पाहिलंत का? दिसायला अगदी हुबेहूब; पहिल्यांदाच एकत्र दिसलं कुटुंब, फोटो व्हायरल
Makrand Anaspure Family : मकरंद अनासपुरे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम करत त्यांच्या विनोदीशैलीने प्रेक्षकांना पोटधरून हसायला भाग पाडलं. आजवर वेगवेगळी नाटके, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. मकरंद अनासपुरेंचा चाहतावर् कमालीचा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक असतात.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही की मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहेत. मात्र सध्या त्या सिनेइंडस्ट्रीत फारशा सक्रिय नाहीत. शिवाय त्यांची मुले इंडस्ट्रीपासून दूर आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर अनासपुरे कुटुंबियांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका चित्रपटाच्या प्रिमिअरला मकरंद अनापुरे त्यांच्या कुटुंबियांसह पहिल्यांदाच पाहायला मिळाले. मकरंद आणि शिल्पा यांना एक मुलगी आणि मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याप्रमाणेच त्याची पत्नीही आणि मुलेही अत्यंत साधी राहणीमान ठेवणारी आहे. त्यांचा हा साधेपणा चाहत्यांना भावला आहे. दरम्यान, मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदर्श कुटुंब म्हणून त्यांचं कौतुक होत आहे.
मकरंद अनासपुरे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'गाढवाचं लग्न', 'साढेमाढे तीन','डावपेच','शासन', 'उलाढाल', 'नऊ महिने नऊ दिवस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हास्याचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा मकरंद अनासपुरे आज जरी मराठी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर असले तरी ते अत्यंत साधं आयुष्य जगणं पसंत करतात.