'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 18:45 IST2022-05-18T18:44:50+5:302022-05-18T18:45:59+5:30

Kushal badrike: कायम आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा कुशल यावेळी त्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

marathi actor kushal badrike latest instagram post viral | 'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike). उत्तम अभिनयशैलीसोबतच त्याच्या विनोदबुद्दीनेही तो प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांमध्ये कुशलचा सोशल मीडियावरील वावर वाढला असून तो अनेक विषयांवर त्याच मत मांडत आहे. यात अलिकडेच त्याने एक पोस्ट लिहित नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कायम आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा कुशल यावेळी त्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कुशलने इन्स्टाग्रामवर त्याचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट शेडमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तो काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या याच भावना त्याने कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांसमोर मांडल्या आहेत.

"इन दस सालों ने जो तजुर्बा दिया. वो, पहेले के तीस साल ना दे पाए, और तजुर्बा ये कहेता है, की मैंने अपनी ज़िंदगी पहेले तीस सालो जी ली है !!", असं कुशलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) माध्यमातून कुशल घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाव्यतिरिक्त त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच तो पांडू या चित्रपटात झळकला होता. तसंच लवकरच तो 'जत्रा 2' मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

Web Title: marathi actor kushal badrike latest instagram post viral