"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:07 IST2025-06-04T14:06:12+5:302025-06-04T14:07:54+5:30

अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

marathi actor indraneil kamat shared special post for on the occasion of ashok saraf birthday | "हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

Indraneil Kamat Post: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी गेली अनेक वर्षे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मनोरंजनविश्वातील प्रत्येक कलाकारासोबत त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ त्यांचा ७८वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने त्यांचा 'अशोक.मा.मा' या मालिकेतील सहकलाकार इंद्रनील कामतने (Indraneil Kamat) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. इंद्रनीलची ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. 


अभिनेता इंद्रनील कामतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "हिमालयाची सावली...! तुम्हाला म्हणालो तसं, मी माझ्या कॉलेजवयीन इंद्रनीलला सांगितलं की मी आता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं तर हसेल तो माझ्यावर, विश्वास नाही बसणार त्याचा. तुमच्यासोबत काम करत असताना कामावर निष्ठा कशी ठेवावी हे समजून घेता आलं. मला माणूस म्हणून, कलाकार म्हणून तुम्हाला अनुभवता आलं, काम करण्याची संधी मिळाली हा मी स्वामींचाच आशीर्वाद समजतो!

यापुढे इंद्रनीलने लिहिलंय, "तुम्ही आम्हा तरुण कलाकारांना विश्वास दिलेला आहे की मराठीमध्ये सुद्धा सुपरस्टार निर्माण होऊ शकतो. तुमच्या इतकं वलय निर्माण करणं अशक्यच. पण, तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा कलाकार म्हणून नेहमीच प्रयत्न राहील. तुमच्या वाढदिवसानिमत्त मी आशीर्वादच मागेन! तुम्हाला मी काय शुभेच्छा देणार, तुम्ही आमचे सुपरस्टार आहात, यंग मॅन! हॅपी बर्थडे...! अशी सुंदर पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. 

Web Title: marathi actor indraneil kamat shared special post for on the occasion of ashok saraf birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.