Hemant Dhome : प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच्या ‘या’ पोस्टवर तुम्ही काय म्हणाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:19 PM2022-09-23T13:19:16+5:302022-09-23T13:20:49+5:30

Hemant Dhome : गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांकडे फिरकेनासे झालेल्या प्रेक्षकांनी थिएटरबाहेर लांबच लांब रांगा लावल्या... याच पार्श्वभूमीवर अभिनेता हेमंत ढोमेनं एक खास पोस्ट करत एक मोठं निरीक्षण नोंदवलं आहे.

marathi actor Hemant Dhome post on marathi audience and theatre | Hemant Dhome : प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच्या ‘या’ पोस्टवर तुम्ही काय म्हणाल?

Hemant Dhome : प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? हेमंत ढोमेच्या ‘या’ पोस्टवर तुम्ही काय म्हणाल?

googlenewsNext

यंदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन 23 सप्टेंबर राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा करण्याचं ठरवलं आणि याच निमित्ताने प्रेक्षकांना एक खास ऑफरही दिली. होय, प्रेक्षकांना केवळ 75 रूपये तिकिटाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, या ऑफरला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांकडे फिरकेनासे झालेल्या प्रेक्षकांनी थिएटरबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. सिनेसृष्टीतील लोकांसाठी हे दृश्य सुखावणारं ठरलं. याच पार्श्वभूमीवर अभिनेता हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) एक खास पोस्ट करत एक मोठं निरीक्षण नोंदवलं आहे.

हेमंतची पोस्ट

‘आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? अशा आशयाची पोस्ट हेमंत ढोमेनं शेअर केली.

हेमंत ढोमेची ही पोस्ट नेटकऱ्यांनी लगेच उचलून धरली. अनेकांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. बरोबर.. कमवायच्या नादात प्रेक्षक गमवला..., अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकाने दिली. विषयच नाही! थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्यातले राहिले नाही, असं मत एकाने व्यक्त केलं. हो, नक्कीच, सिनेमाच्या दरावर मर्यादा असायलाच हव्यात, असं एका युजरने म्हटलं.

 गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृहांची अवस्था वाईट झाली आहे. आधी दोन वर्षे कोरोनात गेली. यामुळे चित्रपटगृह पूर्णपणे बंद होती. याच काळात प्रेक्षकवर्ग ओटीटीकडे वळला. आता चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झाली असतील तरी प्रेक्षकवर्ग ओटीटी सारख्या पर्याय असल्यामुळे चित्रपटगृहांकडे फिरकेनासे झाले आहेत.  सोशल मीडियावरच्या बायकॉट मोहिमेनेही थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. गेल्या काही महिन्यात हिंदीतील मोठ मोठे सिनेमे दणादण आपटले, ते याचमुळे.  मराठीतले  पावनखिंड ,  शेर शिवराज, झोंबिवली,  टाईमपास ३ यासारख्या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली पण प्रेक्षकांच्या सिनेमावर उड्या पडायच्या ते दिवस सगळेच मिस करत आहेत. अशात हेमंत ढोमेचं हे निरीक्षण महत्त्वाचं आहे हे नक्की.
 

Web Title: marathi actor Hemant Dhome post on marathi audience and theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.