प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट! 'एक राधा एक मीरा' आता घरबसल्या पाहा; कुठे आणि कधी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:57 IST2025-03-15T16:55:01+5:302025-03-15T16:57:05+5:30

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' हा चित्रपट  ७ फेब्रुवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला

marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie release on ott platform know about all information | प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट! 'एक राधा एक मीरा' आता घरबसल्या पाहा; कुठे आणि कधी? जाणून घ्या

प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट! 'एक राधा एक मीरा' आता घरबसल्या पाहा; कुठे आणि कधी? जाणून घ्या

Ek Radha Ek Meera Movie: पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' हा चित्रपट  ७ फेब्रुवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. प्रेमाच्या कॅनव्हासवर उमटलेली एक नितांत सुंदर, म्युझिकल लव्ह स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता आली. या सिनेमामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer  Mahajani), मृण्मयी देशपांडेसह (mrunmayee Deshpande)  सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आणि आरोह वेलणकर हे कलाकर मुख्य भूमिकेत आहेत. अशातच या चित्रपटाबद्दल महत्वाची माहिती समोर येत आहे. जवळपास महिनाभरानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे.


नुकतीच 'एक राधा एक मीरा'  चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.  'एक राधा एक मीरा' चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पॅनोरमा स्टुडिओजकडून सोशल मीडियावर याबाबत एक पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. "नव्याने फुलणाऱ्या प्रेमासाठी आणि प्रेमात असलेल्या प्रत्येकासाठी प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट..., 'एक राधा एक मीरा' तुम्ही पाहू शकता @primevideoin वर..." अशी माहिती या पोस्टद्वारे सिनेरसिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. 

प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या चित्रपटातील गश्मीर-मृण्मयीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. 

Web Title: marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie release on ott platform know about all information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.