साध्या पद्धतीने पार पडला होता भाऊ कदमचा लग्नसोहळा; बऱ्याच वर्षांनी फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:39 IST2023-08-21T15:37:11+5:302023-08-21T15:39:34+5:30

Bhau kadam: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

marathi actor bhau Kadam's wedding album photo | साध्या पद्धतीने पार पडला होता भाऊ कदमचा लग्नसोहळा; बऱ्याच वर्षांनी फोटो आले समोर

साध्या पद्धतीने पार पडला होता भाऊ कदमचा लग्नसोहळा; बऱ्याच वर्षांनी फोटो आले समोर

'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम (bhau kadam). झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सध्या सोशल मीडियावर भाऊ कदमच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहे.  हे फोटो पाहून अनेकांनी पुन्हा एकदा त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये भाऊ त्याच्या पत्नीसोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे स्वभावातील साधेपणा भाऊने त्याच्या खऱ्या आयुष्यातही जपला आहे. लग्नातही भाऊ आणि त्याची पत्नी अत्यंत साधेपणात दिसून येत आहे. त्यामुळे कुठेही मोठेपणा न करता त्यांनी सुंदररित्या लग्नगाठ बांधल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

'मी पैसे परत देईन याची खात्री नव्हती'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली भाऊ कदमकडे पाठ

 

'या' कारणामुळे भाऊ कदम आहे डाऊन टू अर्थ; स्वत: केला खुलासा

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये भाऊ कदम आणि त्याच्या पत्नीचे दोन फोटो आहेत. यात एक फोटो लग्नमंडपातील आहे. तर, दुसरा फोटो स्टुडिओमध्ये काढल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये भाऊ कमालीचा वेगळा दिसत आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावर राज्य करणाऱ्या भाऊने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.  पांडू, नशीबवान, टाईमपास, व्हिआयपी गाढव, सायकल, जिंदगी विराट,घे डबल, हाफ तिकीट यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे.
 

Web Title: marathi actor bhau Kadam's wedding album photo