या बसमध्ये बसलेत काही मराठी कलाकार; तुम्ही किती जणांना ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 18:35 IST2023-06-15T18:35:00+5:302023-06-15T18:35:01+5:30
Marathi actors: भरत जाधवने अलिकडेच सोशल मीडियावर एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.

या बसमध्ये बसलेत काही मराठी कलाकार; तुम्ही किती जणांना ओळखलं?
मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत जे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक कलाकाराने त्यांच्यातील मैत्री आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर यांसारख्या कलाकारांच्या मैत्रीची कायम कलाविश्वात चर्चा रंगत असते. यात अभिनेता भरत जाधव बऱ्याचदा सोशल मीडियावर जुने फोटो, व्हिडीओ पोस्ट करत या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक फोटो शेअर केला आहे.
कलाविश्वात सक्रीय असलेला भरत सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसह तो त्याच्या पर्सनल आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असतो. यात अलिकडेच त्याने एक ग्रुप फोटो शेअर केला. हा फोटो एका बसमध्ये काढला असून यात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार बसले आहेत.
"हा फोटो खुप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!", असं कॅप्शन देत भरतने हा फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी ही कलाकार मंडळी कोण असतील याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
या फोटोतील मराठी कलाकारांना ओळखलं का?
भरत जाधवने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत मराठी कलाविश्वातील काही दिग्गज कलाकार झळकले आहेत. या फोटोमध्ये अंकुश चौधरी, अरुण कदम, भरत जाधव, बेला शिंदे, केदार शिंदे, अरुण पाचपुते, जयराज नायडू ही कलाकार मंडळी आहेत.