पत्नी अभिनेत्री असूनही अशोक मामांना आवडायचा रंजनाचा अभिनय; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 07:00 IST2022-07-01T07:00:00+5:302022-07-01T07:00:00+5:30

Ashok saraf: एकेकाळी अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही जोडी सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जायची. या दोघांनी मिळून अनेक चित्रपट एकत्र केले.

marathi actor ashok saraf shares memory of actress ranjana | पत्नी अभिनेत्री असूनही अशोक मामांना आवडायचा रंजनाचा अभिनय; म्हणाले...

पत्नी अभिनेत्री असूनही अशोक मामांना आवडायचा रंजनाचा अभिनय; म्हणाले...

मराठी कलाविश्वावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अशोक सराफ(Ashok Saraf) . विनोदाचं उत्तम टायमिंग सांभाळणाऱ्या अशोक सराफ यांनी गंभीर भूमिकाही तितक्याच लिलया पेलल्या. त्यामुळे आजही कलाविश्वात त्यांचं नाव आदरानेत घेतलं जातं. अशोक सराफ यांचे असंख्य चित्रपट गाजले. यातले काही चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'बिनकामाचा नवरा'. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री रंजना देशमुखसह (ranjana) स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाचा अनुभव नेमका कसा होता हे त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं.

एकेकाळी अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही जोडी सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जायची. या दोघांनी मिळून अनेक चित्रपट एकत्र केले. यात त्यांचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. त्यामुळेच एका मुलाखतीत त्यांनी रंजनाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ या स्वत: एक उत्तम अभिनेत्री असूनही अशोक मामांनी रंजना त्यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा यावेळी केला.

काय म्हणाले अशोक सराफ?

"रंजना ज्यावेळी कलाविश्वात आली त्यावेळी तिने विनोदी सिनेमा किंवा विनोदी भूमिका केल्याच नाहीत. तिने माझ्यासोबतच पहिल्यांदाच विनोदी भूमिकांची सुरुवात केली. त्यावेळी तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं. विनोदामध्ये रंजना अशोकवर भारी पडतीये असंही अनेकांनी म्हटलं होतं. पण, त्यावेळी हे ऐकून मलाही छान वाटायचं. कारण, ती अभिनेत्री म्हणून ग्रेटच आहे यावर मी तोपर्यंत शिक्कामोर्तब केला होता. अशी कोणतीही भूमिका नव्हती जी रंजनाला जमणार नव्हती", असं अशोक सराफ म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "त्याकाळी रंजनासारखी दुसरी अभिनेत्री नव्हती. तिच्यानंतर इतरही अभिनेत्री आल्या. त्यांच्यासोबतही मी काम केलं. पण रंजनासारखी रंजनाच होती."

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी रंजनाचा अभिनय विशेष आवडायचा असंही सांगितलं.  विशेष म्हणजे त्या काळी अशोक सराफ आणि रंजना यांच्या नात्याविषयी अनेक उलटसुटल चर्चाही रंगल्या होत्या. 
 

Web Title: marathi actor ashok saraf shares memory of actress ranjana